Vaikhari

Vaikhari Patil

Professor in Viva College, Virar. Like to travel, visit spots close to nature, read book & write!

चिंब पावसानं रानं झालं आबादानी

1522

जून महिन्याच्या मध्यानंतर सर्वांच्याच मनात हे गाणं गारवा निर्माण करतं. जसजसा पावसाचा नित्यक्रम वेग घेतो, तसतसा "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" होउ लागतो. एकदा का पावसाचे थेंब स्पर्श करू लागले; सुरू होते ती निसर्गप्रेमींची भटकंती. आणि ह्या भटकंतीच प्रथम प्रेम म्हणजे Trekking. Trekking प्रेमींच्या मनातले डोंगर हिरवी साद घालू लागतात. निरनिराळ्या ठिकाणांचे  निमित्त साधून हे प्रेमी trekking साठी सज्ज होतात. 

 

अशाच निसर्गरम्य ठिकाणांपैकी trekking ची मजा येते, महाबळेश्वरच्या उंच टोकांवर. सह्याद्रीच्या रांगेतील महाबळेश्वर हे सर्वात उंच थंड हवेचे ठिकाण. महाबळेश्वर ही तशी हिवाळी सुट्टयांचे ठिकाण. मात्र आमचा पावसाळ्यातील trekking चा अनुभव अभुतपुर्ण होता. मुंबईपासून सुमारे २८५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या महाबळेश्वरला पोचायला ५ ते ६ तास लागतात.

 

महाबळेश्वर ते प्रतापगड trek खूप प्रसिद्ध आहे. आम्ही मात्र महाबळेश्वरच्या प्रसिद्ध points च्या ठिकाणी trekking चा अनुभव घेतला. उंच टेकडीवरच्या नयनरम्य द्रुश्यांची  मजा घ्यायला मी सज्ज असते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची trekking  ची तयारी न करता आपण महाबळेश्वरच्या उंच points चा अदभुत अनुभव घेऊ शकतो. 'एलिफंट हेड' हा सर्वात उंच point. हत्तीच्या डोक्याप्रमाणे आणि त्याच्या सोंडेसमान असल्यामूळे ह्या जागेला एलिफंट हेड हे नाव पडले आहे. ह्या जागी चढायला १ ते २ तास लागतात. एलिफंट हेड ला पोचेपर्यंत मधे Kate Point सुद्धा रमणीय अनुभव देतो. ब्रिटिश गव्हर्नर सर जाँन मँकलेन यांच्या मुलीच्या नावावरून केट हे नाव प्रचलित आहे. Trekking प्रेमी ह्या दोन्ही points चा अविस्मरणीय  अनुभव घेऊन मंत्रमुग्ध होतात. 

 

मी जेव्हा या दोन्ही points च्या जवळ पोहोचले तेव्हा हळूच संपूर्ण शरीर हलके होऊन एक शांतताप्रिय अनुभव मनाला सुखावून गेला. जगातील एका उंच आणि शांत ठिकाणी जेव्हा आपण उभे राहतो, तेव्हा एक नवीन उर्जा नवीन जगण्याची उमेद देऊ लागते. देवाच्या जवळ असल्याचा आभास होऊ लागतो. डोळे तासंतास त्या हिरव्यागार निसर्गाकडे पाहत रहातात. पावसाने सजविलेल्या त्या सुंदर धरणीकडून स्वर्ग सुखाची अनुभूती मिळते. Trekking साठी महत्त्वाची असते ती तुमची ओढ आणि उत्साह. ऊर्जा आणि चालण्याची शक्ती ही आपोआप मिळत जाते. खुपदा आपण मित्रांसोबतच trekking ला निघतो, मात्र जेव्हा एक एक पाऊल पुढे टाकत असतो तेव्हा  आपण एकटेच चालत असल्याचा  भास होत राहतो. ही गोष्ट, जिवनात स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः मेहनत घेण्याची जाणीव करून देते. स्वतः ची तहान भूक विसरत त्या हिरव्या सुखामागे तन आणि मन वाहवत जातं. निसर्गाची स्तुती आपण काय करणार!! त्या मोठ्या मोठ्या डोंगरांवर चढताना आजुबाजूची झाडे, त्यावर बसलेले निरनिराळे पक्षी, लालसर माती, पायाला हलकेच टोचणारे दगड आणि मनाला मिळणारा आनंद हे समिकरण म्हणजे अद्वितीयच. पावसाळ्यात तर महाबळेश्वरच्या डोंगरांवर ढगं आपल्या सोबत चालत असतात. आणि जर पाऊसराव आपल्यावर खुश असतील तर ढगातल पाणी आपल्यावर शिंपडत आपली साथ देतात. "सातव्या आसमानात" उभं असल्याची अनुभूती Elephants head आणि Kate point देऊन जातात. 

 

महाबळेश्वरच्या त्या सर्व points मधील तसा. फारसा माहित नसणारा point म्हणजे  'सावित्री'. TV मधे  दाखवलेल्या स्वर्गाचा जणू अनुभव. चारही बाजूंना दिसणाऱ्या मोठ्या मोठ्या , नजर खाली न पोचणाऱ्या दऱ्या आणि त्या दऱ्यांमधे वाहणारे ढगं आणि धबधबे. अतिशय मनमोहक !! उंच माथ्यावरून. चहूकडे पाहताना डोंगरांनी मागे पुढे रांगा लावलेलं  द्रुश्य म्हणजे कमालीचा देखावा. सर्व points फिरताना आम्ही या सावित्री point वर येऊन पोहोचलो आणि तेथेच हरवून गेलो. दरीत खाली डोकवलं, तर काय! चक्क धबधबा गुरूत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाहताना दिसला. पावसाच्या सरी अंगावर बरसत होत्या. मुंबईहून गेलेल्या लोकांसाठी हा गारवा म्हणजे आश्चर्यचं! सावित्री point ची खासियत म्हणजे सर्वत्र ढगं खाली उतरलेले आणि आपल्या सोबतीला वावरणारे. चौफेर असलेली डोंगर रांग आणि तिथून दिसणारी नयनरम्य निसर्गाची सौंदर्यता.

 

Trekking ला लागणारी energy ही सोबत घेऊन जावी लागत नाही, निसर्गाच्या जादूने ती आपोआप शरीरात भिनभिनते. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांचे आवाज, पक्षांचे आवाज, लाल मातीचा सुवास, ढगांचा गारवा आणि पावसाची रिमझिम जगण्याच्या नवीन उमेदे बरोबर एक अविस्मरणीय सुख देऊन जाते.

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Kunal
Kunal Raut
19-Jul-2020 07:22 AM

अतिशय सुंदर वर्णन.

Rajendra
Rajendra Raut
19-Jul-2020 09:47 AM

मनमोहक निसर्गा मद्धे मनाला चिम्ब भिजवणार सुखद वर्णन.

Kalavati
Kalavati Raut
21-Jul-2020 12:03 AM

वैखरी चिंब पावसाने आबादनी झाल्याचा सुखद आल्हाददायक अनुभव तू आम्हाला घरबसल्या दिल्याबद्दल धन्यवाद. अक्षरशः हिरव्या नवलाईने नटलेल्या डोंगरातून ,ढगांच्या दुलईतुन चालण्याचा मनोहारी अनुभव आम्हाला मिळत होता. सुंदर वर्णन.

Mangesh
Mangesh Patil
21-Jul-2020 01:35 AM

अतिशय सुंदर प्रवास वर्णन.

Meenal
Meenal Patil
21-Jul-2020 01:44 AM

ढगांच्या साथीने चिंब पावसात लुटलेल्या मनमुराद आनंदाचे व मनमोहक निसर्गाचे सुंदर प्रवास वर्णन.

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

9 + 9=    get new code
   
Post Comment