Vilas

Vilas Raut

Advocate by profession, a Poet by heart!

काय यो जमाना आला

1756

काय यो जमाना आला


अहं होणार हाय याहा कवास विसार नय केला


आजीयं घड्याळ इतिहास जमा झालं,

हिंड्याफोन,वाटसँप न सेल्फीन

पोराबाळांना वेडं करुन टाकलं ।।


शाळेत न कालेजामनस्या तरणयांह्या

कानांना सदा न कदा फोनसे भोंगे लागलेले,

कोणलावं कायवं बोलव्याही सोय नय

जकलेस इंटरनेटसस्या जाळ्यात फसलेले

...अहं होणार याहा कवास विसार नय केला।।


आमशी आजीवं फोनस्या  डी.पी.त जाऊन बहली

तीवं पोरां बाळांस घणस कौतीक करुन रेली

फ़ेसबुकजुनते जादूही कांडी जही फिरवली

पोरंबाळं अभ्यासाही बुकं मात्र पार विहरली

...अहं होणार याहा कवास विसार नय केला ।।


कायवं हांगा या  हुतेर्यान जग ज़री मेरे आणलं

पण खरं ते सर्वसामान्याहं जीवन हराम केलं

...अहं होणार याहा कवास विसार नय केला ।।


आता खरी कसोटी याला लगाम लावण्याही

पोराबाळांना आयबाबांहा वसक ठेवव्याही

खरसं हांगतं नका बाबांनो फसू या मायाजालात

...अहं होणार याहा कवास विसार नय केला ।।

 

स्वरचित कविता
कवी - विलास ल. राऊत.

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Kunal
Kunal Raut
07-Nov-2018 04:01 AM

वा... बो बेस वर्णन लिवलंय काकां जुन... खरस, यो जमाना बदललाय

Mangesh
Mangesh Patil
07-Nov-2018 08:55 PM

विलासआप्पा घणी फक्कड कविता. आजशा जमान्यात लागू परवडणारी.

Rajendra
Rajendra Raut
16-Nov-2019 09:41 PM

फक्कड़ कविता,DP मनशी आजीव आज काल वॉट्सअप वर रमव्या लागली.....बो बेस.

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

8 + 1=    get new code
Post Comment