* सन २०१९-२० ह्या वर्षा करीता श्री. विनय रघुनाथ राऊत (मुळगाव अल्याळी) ह्यांची समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.    * WhatsApp helpline number for website related queries is 83696 80349. Drop a message to seek help.    * 'New User' registration available in Login window.    * Please visit all the sections of website and let us know your feedback.    * Click here to 'Generate Pin' through Login window.

Editorial

माझ्या प्रिय समाज बंधु-भगिनिंनो,

देशा-परदेशात विखुरलेल्या आपल्या समाजातील व्यक्तींना एका मंचावर एकत्रीत करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यास आम्ही सुसज्ज होत आहोत. निमित्त आहे ते आपल्या समाजाच्या वार्षिक क्रिडा स्पर्धेचे. ही स्पर्धा म्हणजे आपल्या समाजाचा कुंभमेळाच जणु. लहान-थोर, चिल्ली-पिल्ली तसेच वडिलधारी मंडळी विविध स्पर्धांमधे उत्साहाने सहभागी होत असतात. आपल्या नोकरी-व्यवसायातुन रजा घेऊन स्पर्धे दरम्यान जीवाचे रान करणारी काही मंडळी आहेत. तसेच, दुरदेशी वास्तव्यास असलेली काही कुटुंबे विशेष सुट्टी काढुन स्पर्धेला उपस्थित राहातात. तरी यंदाच्या वर्षी होऊ घातलेल्या ह्या स्पर्धेसाठी आम्ही आपणास, स्पर्धा आयोजकांच्या वतीने, आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.     पुढे वाचा...

Website Acknowledgement