Achievers Achievers

आपले पुर्वज हे बिंब राजाचे क्षत्रिय योद्धे होते, राज्य विस्ताराच्या निमित्ताने ते राजस्थान मधुन उत्तर कोकणात आले आणि पुढे येथेच स्थाईक होऊन त्यांनी शेती-वाडी चा व्यवसाय केला. स्वतंत्र भारता मधे समाजातील अनेक पुढाऱ्यांनी, येणाऱ्या काळातील शिक्षणाचे महत्त्व ओळखून, संघटीत होऊन, समाजातील बंधु-भगिनिंना शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. त्यांच्या सादेला दाद देत, अनेक समाजबंधु भगिनींनी उच्च शिक्षण पूर्ण केले, काही मंडळींनी परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. आज समाजाची साक्षरता पत जवळपास १००% आहे.


दशदिशांना कर्तृत्व गाजवत आपल्या माणसांनी यशाची अनेक क्षेत्रे आणि शिखरे पादाक्रांत केली. एखाद्या जातीची ओळख हे त्या ज्ञातीतील कर्तृत्ववान लोकांमुळे होत असते. आपल्या समाजाचा इतिहास आपण तपासून पाहिला तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील, की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाची मान उंचावण्यास मदत केली आहे. क्षेत्र कोणतेही असो, क्रिडा, व्यवसाय, शैक्षणिक, राजकारण, समाजकारण, अभिनय, अथवा आपला पारंपरिक व्यवसाय शेती. आपल्या समाजबंधु आणि भगिनींनी आपला ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटविला आहे. त्यातील काही मंडळी प्रकाशझोतात आली, तर काही पडद्यामागे राहून आपले कार्य निमूटपणे करत आहेत.


ज्यांनी आपआपल्या क्षेत्रात नाव कमावून समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे, अशा सर्वच समाजबंधु भगिनींची ओळख, आपल्या या वेबसाईट वर करून द्यायची आहे, जेणेकरून ईतर लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि यांच्या प्रेरणेतून आणखी समाजरत्न पहावयास मिळतील. आपणास ज्ञात असलेल्या अशा विशेष कर्तृत्ववान बंधू, भगिनी, मुलं आणि मुलींची फोटो सह संपूर्ण माहिती कळविल्यास या वेबसाईट वरील समाजभूषण या सदरात त्यांनाही स्थान देता येईल.