Villages Sports Note: All participants are requested to login and upload their own profile picture. This picture will be displayed in all the participated events. Click here for login help

Rules & Regulation
Year 2022-23

मानवाच्या सामाजीक उत्क्रांती पासुनच, समाजाच्या एकुण जडण-घडणीत, त्याने अवलंबिलेल्या विविध खेळांना प्रमुख स्थान आहे हे नक्की. माणसाच्या शारीरिक आणि बौध्दिक विकासात या सर्वच खेळांचा महत्वपूर्ण वाटा आहे. सुरुवातीच्या काळात मनोरंजन किंवा विरंगुळा म्हणून खेळल्या जाणाऱ्या खेळांनी, काळानुरुप बदलत जाऊन आज व्यावसिकतेचे रूप धारण केलेले आहे. या बदलांमुळे, खेळ हाच करिअर म्हणून निवडणाऱ्या सर्वच खेळाडुंना स्वतःला तंदुरूस्त ठेऊन सतत सिद्ध करण्याची नितांत आवश्यकता वाढली आहे. पौष्टिक आहार व योग्य व्यायाम या दोन गोष्टींचे महत्व खेळाडूंच्या जीवनात कैक पटीने वाढले आहे. असा हा आजचा सर्वांगीण, संतुलित खेळाडु अतिशय शिस्तप्रिय तसेच कठोर मेहनत करणारा बनला आहे. राष्ट्राच्या ऊन्नतीसाठी या सवयींचे महत्वं जाणुन, सरकारनेही त्यास प्रोत्साहन देण्यास सुरू केले आहे.

काळाची पाऊले ओळखून आपल्या सो.पा.क्ष. संघाच्या माजी समाजधुरिणांनी समाजाच्या सर्व व्यक्तींना एकत्र आणताना, सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांपैकी एक प्रयत्न म्हणून समाजबंधु-भगिनींचे समाजांतर्गत विवीध खेळातील सामने भरविण्यास सुरूवात केली. यामुळे विविध गुणांनी समृद्ध असलेल्या, पण आर्थिक बंधनात अडकलेल्या समाजातील खेळाडुस त्याची प्रतीभा उजेडात आणण्यास वाव मिळाला, त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. अनेक भगिनींनी ह्या खेळांमध्ये उस्फुर्तपणे भाग घेऊन ह्या स्पर्धांची शोभा वाढवली.

अलीकडे, समाजातील काही तरूणांनी एकत्र येऊन ह्या स्पर्धा पारंपारीक पद्दतीने न भरवता, आधुनिकतेची कास धरून व्यावसायीक पातळीवर भरविण्यास सुरूवात केली आहे. या प्रणालीचा अवलंब केल्यापासुन खेळाडूंची प्रत्येक स्पर्धेतील रुची वाढलेली आहे. तसेच स्पर्धकांचाही उत्साह द्विगुणीत झालेला आढळतो. विरार येथे रहाणारे श्री. उत्पल पाटील (गाव-नरपड) यांची मुळ संकल्पना व त्यांच्या सहकाऱ्यांची लाभलेली मोलाची साथ यामुळे आज खेळांचे स्वरूप संपूर्णपणे बदललेले दिसत आहे. याकामी संघाच्या माजी अध्यक्षा सौ. प्रणिता पंकज ठाकुर ह्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन खूप मोलाचे ठरले आहे.

खेळांतील झालेल्या या बदलांची इत्यंभूत माहिती आपणापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही बांधील आहोत. डिजीटल युगाशी जुळवुन घेत, सन २०१८-१९ ह्या वर्षा पासुन संघाच्या स्पर्धांचे गुण-तक्ते रियल टाईम अपडेट्सनी जगातील प्रत्येक व्यक्तिला सहज उपलब्ध असणार आहेत. तसेच, YouTube Live वर काही सामने प्रसारीत करण्याचा देखील मानस आहे. सर्वांगीण विकास साधत, आपला समाज कात टाकत असुन, आम्ही आपणास या क्रांती मध्ये सहभागी होण्यास साद घालत आहोत!