Shilpa

Shilpa Thakur

माझ माहेर वरोरचंआहे.मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून एकूण सेवा 27वर्ष .आदिवासी भागात 25 वर्ष नोकरी झाली असून सध्या सफाळे ,टेंभीखोडावे येथे कार्यरत आहे. समाज सेवेची आवड आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत मिळवून दिली आहे.

माया एक अविस्मरणीय प्रसंग

1666


           🌷  माया एक अविस्मरणीय प्रसंग 🌷


टण टण टण घंटेया 🔔🔔 आवाज आयकून भराभर आपली दप्तरं पाठीला मारत जकली वानरसेना👦🏻👱🏼‍♂ बायेर पडली. भावी पिडीयी गुणी पोरं शाळेया 🏫 खिडक्या दरवाज्ये लावून  माला टाटा👋🏼👋🏼 करुन ऐटीत निंगून गेली. मीन शाळेतटे पावलं. तीनव एक उसासा होडला, आता हकाळविरी  तरी निवांतपणा मिळव्या होथा. नेहमीप्रमाणे  मीन सभोवार नजर टाकली. हेडबाईया हातात साव्या🔑 देवून माया रस्ता धरला. तही मला घाई नहव्यायीस कारण  डहाणू चिखला वडकती पाड्याला अहताना हानशे सहा वाजे नंतरस माई लालडबा बस 🚌 येव्यायी. नेहमीया जागेवर जावून बहली न हमोर   रोजश्यापरमाणे पावलं ते अथांग सागर 🌊 शांत जालेला दिखला. सुर्य🌞 देव सुद्धा आता निगव्याया तयारीत दिखत  होतेे. हळूहळू संध्येन आपण आल्यायी साहूल दिली. नेहमीप्रमाणे  टायमानंतर बस आली, न मी बस 🚌 मन सडली. प्रवासी न वर्दळ कमी अहल्यामुळे, बस कवा पारनाक्यावर पोसली ते हमजलव नय. मी बसमनशी उतरून लगेच रिक्शा पकडून डाणू खाडीवर आली. धक्काव तहा थोडा शांतस वाटत होता, तवड्यात होडी🛶 आली. चार पास महाणं होडीत सडली न  नावाड्यान इंजिन सालू केलं. गारगार वाऱ्यार लाटेये हेलकावे खात होडी किनाऱ्याला 🏖 लागली. महाणं उतरून आपपल्या वाटेन सलव्या लागली, मीव बस थांब्या दिशेन सालत आली. हानशे सात वाजलोये. हमोर माय लक्ष गेलं न माला आनंदाया उकळ्या फूटल्या. कारणव तहस होथं. रोज रातश्या साडेसात वाजेया बसला कवातरी दोन, चार माहणं दिखव्यायी तय आज बऱ्यास माहणायी गर्दी होथी. ओळखिये गुरूजी दिखले भगून मेरे जावून चौकशी केली ते कळलं आज बस बंद हात. डोक्याला हात मारला. आता का करव्याहा 🤔 रातशे आठ वाजले न शिसणी  पर्यंत अहलेल्या माहणायीन सालत जाव्या ठरवलं. गुरूजी आमश्या गावशेस, माला पोरी मानत. त्यायीन हांगटल ,"नेत्रा आता सालत जाव्या शिवाय पर्याय नय". (हिंड्याफोन ते तवा नवतेस. माय लगीन झालतं पण भांडूप वरसन येणं शक्य नव्हतं भगून मी वरोरातस रेतोयी ) आईला कळव्याया कोणतास मार्ग नवता. शेवटी  गुरूजी बरोबर मी सालत जाव्याय ठरवलं, खाडी ते तडीयाळे पर्यंत साधारण घरं 🏚🏡होथी. नंतर रस्ता अगदीस सुनसान झाला. गुरुजी न बिजी माहणं वार्ता करत करत सालतोयी. रातशे🌘 रातकिड्याया 🐞🐝 किरर..आवाज न निरव शांतता. रस्त्यार बहलेलं एखाद कुत्र त्यायी निजमोड झाली भगून केकाटव्याय . माला ते त्या वेळेला गिरा, भुताळीण, हडळ 💀☠👽ये जकले आठवले. मा मंगारी कोण तरी अहेन, न माया गळा पकडेन अह हरक हरक माया मनात येतोव. पण कोणाला हांगूव 😷 शकत नवती. अह करता करता एकदाह वरोर आलं. गुरुजीन माला घराविरी नेलं. मा आई ते बिसारी डोळ्यात तेल घालूनस बहलोयी. माला पावून तिला जो आनंद झाला त्याहा वरणन शब्दांत करता नय येव्या. पण तियास पुण्यकर्मामुळे मी सुखरुप घरा पोसली.😇😇

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Kunal
Kunal Raut
17-Aug-2018 10:53 PM

"एखाद कुत्र त्यायी निजमोड झाली भगून केकाटव्याय" - ये वासताना घणं हहाव्या आलं🤣😂👍

Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

2 + 3=    get new code
Post Comment