Meenal

Meenal Patil

सौ. मीनल मंगेश पाटील ह्यांचे मूळ गाव घिवली. त्या पूर्वाश्रमीच्या कु. शालीनी वामन पाटील, पंचाळी येथील श्री वामन रामजी पाटील यांच्या कन्या. लग्नानंतर पती श्री. मंगेश गणपत पाटील यांचे बरोबर नोकरीनिमित्त पालघर येथे रहावयास आल्या, आणि कायमस्वरूपी पालघरवासीय झाल्या. सुरुवातीच्या खडतर काळात पतीच्या मागे खंबीरपणे उभे रहात, भारतीय पोस्ट खात्यात 32 वर्षे नोकरी करून, त्यांनी संसाराला मोलाचा हातभार लावला. दोनही मुलींना उच्चशिक्षित करून त्यांचे संसार मार्गी लावले. दोन विवाहीत मुली, जावई तसेच नातवंड असा त्यांचा समाधानी परीवार आहे. निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचे छंद , अवांतर वाचन,लेखन आणि गायन हे छंद त्यांनी जोपासले आहेत. त्यांना सामाजीक कार्याची आवड आहे. निरनिराळे पौष्टीक खाद्य पदार्थ बनविण्यात त्यांना विषेश आनंद मिळतो. भ्रमंती करून अनेक अनुभव गाठीशी बांधण्यात त्या सदैव उत्सुक असतात. त्यांना गायनाची आवड असल्यामुळे घरगुती मैफलीत मराठी चित्रपट संगितातील बहुतेक नावाजलेल्या गाण्यांचा आस्वाद त्यांच्या निकटवर्तीयांना नेहमीच घेता येतो. गाण्यांचा आस्वाद जरी आपणा सर्वांना नाही घेता आला, तरी त्यांच्या लेखणीचा आस्वाद आपणास या इथे नक्कीच घेता येईल.

चौकळशी वाडवळ समाजातील लग्नविधी - भाग तिसरा

1132

 

लग्न विधीला लागणारे साहित्य :   

१) गणेश पूजन :

 

(हे  साहित्य ब्राह्मणाने दिलेल्या यादी नुसार आहे.)

  • हळद-कुंकू
  • अबीर
  • गुलाल
  • कापूर
  • उदबत्ती
  • कापूस
  • नारळ -३
  • सुपारी  -१०
  • खायची पाने -१०)
  • केळी -१२
  • दूध
  • तूप
  • साखर
  • मध
  • दही
  • तांदूळ -एक किलो
  • गूळ
  • खोबरे वाटी
  • खडीसाखर
  • फूले
  • दूर्वा
  • वेणी
  • गजरा
  • आंब्याच्या डाहाळाची फांदी
  • तांब्याचे तांबे -२
  • ताम्हण -१
  • संध्यापळी
  • पंचपात्रे
  • ताटे  -२
  • पराती   -२
  • वाटी किंवा द्रोण  -६ नग
  • चौरंग  -१
  • पाट   -६
  • समई   -१
  • निरांजन  -२

 

२) घाणा मेढी साठी लागणारे साहित्य :

 

  • सागाची मेढ  -१
  • उंबराची मेढ  -१
  • हिरव्या सालाचा नारळाचा जोड  -१
  • कोहळे  -१
  • सालासह सुकडी नारळ
  • सुके आख्खे भात
  • नाचणी
  • कोरी सुपे  -४
  • उखळी  -१
  • मुसळं   -४
  • (घरात मुलाचं लग्न कार्य असल्यास सागाची आणि उंबराची मेढी प्रत्येकी दोन घेणे.)

 

३) हवनासाठी :

 

  • हळद
  • कुंकू
  • अबीर
  • गुलाल
  • कापूर
  • कापूस
  • उदबत्ती
  • नारळ  -५
  • केळी
  • इतर फळे (पाच प्रकारची)
  • दूध
  • तूप
  • साखर
  • मध
  • दही
  • गहू  -सव्वा किलो
  • तांदूळ  -२ किलो
  • अक्रोड  -९
  • बदाम   -९
  • खारीक  -९
  • हळकुंडे  -९
  • गुळ 
  • खोबरे वाटी  -२
  • समिधा
  • होमपुडी
  • शहाळी  -४
  • सागाच्या  सीलक्या
  • गोवर
  • लाल कापड  -एक मीटर
  • सफेद कपडा  -एक मीटर
  • फुले , दूर्वा, वेणी, गजरा
  • जान्हवं जोड
  • आंब्याचं डहाळं
  • कच्च्या सुताचा गुरा

 

४)  पाटा पूजन :

 

  • पाटा -१
  • मातीचे मडके -१
  • नारळ -१
  • तांदूळ ,पैसे, सुपारी व लग्नातील लाडू
  • पापड  -९
  • तांदळाचे पापड (हाकोळ्या)-९
  • तांदळाच्या पिठाचे पेढे -९
  • हळकुंड -९
  • सुपाऱ्या  -९
  • आंब्याची पाने
  • पाट्याला बांधण्यासाठी कच्चा दोरा

 

५)  मयारासाठी :

 

  • मातीचे मोठे मडके  -१
  • लहान मडके  -१
  • कोडे  -१
  • बोरुची काडी  -१
  • कापसाची लांब ज्योत
  • तांदळाचं पीठ व तांदूळ
  • हळकुंड
  • सुपारी
  • बदाम,अक्रोड,खारका
  • पापड
  • लग्नातील बुंदीचे लाडू
  • ब्लाउज पीस
  • मयारं चालविण्यासाठी ओली हळद.
  • बोरुच्या काडीला बांधण्यासाठी कच्चा दोरा.

 

६)  काकणासाठी :

 

  • नवरा / नवरीसाठी फुलांचा हार  -१
  • फुलांची मुंडावळ  -१
  • हातावर बांधण्यासाठी काकण
  • हातात घेण्यामसाठी सजविलेल्या नारळाचा तोटा
  • भाचा / भाचीला देण्यासाठी कपडे
  • बहिणीला व भावजीला देण्यासाठी कपडे
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

3 + 3=    get new code
   
Post Comment