Suhas

Suhas Raut

मी सुहास काशिनाथ राऊत,वयाच्या पासष्टीत आहे.वरोर,तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर हे माझं गांव.वडील कै.श्री काशिनाथ केशव राऊत हे वरोरच्या वाडीआळीतील तर आई कै.सौ.शशिकला (पुर्वश्रमीची मनु पांडुरंग पाटील) ही पण वरोरच्याच पाटील आळीतील.०८ आक्टोबर १९५३ ला वरोरला आजोळी माझा जन्म झाला.आम्ही ३ भाऊ,३ बहिणी.माझा नंबर तिसरा.त्या वेळी "हम दो!हमारे दो!"चा नारा नव्हता.नाहीतर माझा तिसरा नंबर लागलाच नसता. वडील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक,नोकरीच्या अखेरच्या कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले.आई गृहीणी.वडीलांना समाजसेवेचीही आवड होती.आम्ही सोमवंशी पाठारे क्षत्रिय ( वाडवळ) समाजातले.सदर समाजाचे अध्यक्षपदही वडीलांनी भुषविले.वडील अभ्यासात हुशार होते.पुर्वीच्या फायनल ( ईयत्ता ७ वीच्या) परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले होते,तर प्राथमिक शिक्षकांच्या पी.टी.सी.(आताच्या डी.एड.समकक्ष) परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले होते.त्यांना लेखनाची आवड होती.त्यांच्या २५० कथा,कविता,लेख,२५ नियतकालिकांतुन प्रसिध्द झालेल्या आहेत. मला लेखनाचा वारसा त्यांच्या कडुनच लाभला.वडीलांच्या नोकरी निमित्त आम्ही वरोर,निर्मळ,सातपाटी,तलासरी,बोर्डी,चिंचणी येथे राहिलो. माझे प्राथमिक शिक्षण वरोर व तलासरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत,तर माध्यमिक शिक्षण ठक्करबाप्पा हायस्कुल,तलासरी व के.डी.हायस्कुल,चिंचणी येथे झाले.खासदार कै.श्री चिंतामण वनगा हे माझे वर्गमित्र,आम्ही तलासरीला ईयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत एका वर्गात शिकलो.एफ.वाय. व इंटर आर्टसला मी मुंबईच्या पार्ले काॅलेजला होतो. परिस्थितीवश नोकरी करणे भाग पडल्याने मी एप्रिल १९७४ ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मिळालेली निम्नस्तर लिपिकाची पहिलीच नोकरी पकडली.पुढील शिक्षण बाहेरुन करण्यासाठी पुणे विद्यापीठ तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रवेश घेतला पण संसार व नोकरी या मुळे बी.ए.होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पेण,डहाणु,तलासरी,पालघर,बोईसर,वसई येथे ३७ वर्षे नोकरी करुन आॅक्टोबर २०११ ला ऊच्चस्तर लिपिक पदावरून सेवा निवृत्त झालो.सेवानिवृत्ती नंतरही ५ वर्षे जानेवारी २०१६ पर्यंत विद्युत मंडळात बाह्यश्रोत पध्दतीने काम करीत राहिलो.जुलै २०१६ पासुन एका सुरक्षा एजन्सीत काम करीत आहे.सध्या डहाणु पुर्वेला कॅनरा बॅंकेत आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी १४ आॅक्टोबर १९७५ ला नरपड, (दक्षिण आळी)तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर येथील कु.कल्पना अरूण पाटील,त्या वेळचे वय वर्षे १६ हिच्याशी प्रेमविवाह झाला.एक मुलगा वय वर्षे ४१ व एक मुलगी वय वर्षे ३८ आहेत.दोघां कडुन वय वर्षे १३ व वय वर्षे ३ चे नातु आहेत. २५ वर्षे वाणगांवला वास्तव्य होते ११ वर्षांपासुन डहाणुला वास्तव्य आहे. वयाच्या १८ व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिध्द झाली.आज पर्यंत २५ नियतकालिकांतुन १०० च्या वर कथा,कविता,लेख व स्फुट लेखन प्रसिध्द झाले आहे. वाॅटसअप व फेसबुकवरही मराठी व बोलीभाषा वाडवळीत लेखन करतो.दिनांक २८ जानेवारी २०१८ ला सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ ट्रस्ट फंडाचा "सौ.जया लीलाधर चौधरी—पुरस्कृत लेखक/ कवी प्रोत्साहनपर गुणवंत गौरव पुरस्कार"मिळाला आहे. —सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु,09923004895.

"माथेरानचे मंतरलेले दिवस आणि धुंद,मादक,मस्तावलेल्या रात्रि!"

1655

 (१)
:माथेरानचे
"मंतरलेले दिवस,
धुंद,मादक,मस्तावलेल्या रात्रि!"

अनुभव लेखन:—
सुहास काशिनाथ राऊत
/वरोरकर,डहाणुरोड,(पुर्व).
मो.09923004895.

    पायथ्याच्या नेरळ रेल्वे स्टेशन पासुन डोंगर माथ्यावरील वर्तुळाकार चढणी ऊतरणीच्या डांबरी रस्त्यावरुन ऊंचावरील माथेरान दस्तूरी नाक्यापर्यंत ७ किलोमिटर वाहने येवू देतात.तेथे फाॅरेस्टचे खात्याचे भव्य पार्किंग आहे,तेथे भाड्याने वाहने सुरक्षित पार्क करुन तेथून ४ किलोमिटर पाई,घोड्यावरून किंवा माणसांनी ढकललेल्या हात ढकलगाड्या वरूनच माथेरानला जावे लागते.मिनी ट्रेन वरपर्यंत येते पण  ती तांत्रिक बिघाडामुळे बंद होती.एका घोड्यावर एकच जण,प्रत्येकी रूपये ३५० घेतात.माणसांनी ढकललेल्या ढकलगाडीत एकच माणूस बसतो,भाडे ४५० रूपये. घोडेवाला घोड्यांच्या वेसणीला हात धरून हळूहळू घोडे चालवतो,सामान ऊचलायला मजुर ऊपलब्ध,त्यात बहुतेक स्रियांचा/मुलींचा भरणा जास्त.त्या बोचकी मोजुन,माणसं पारखुन दिडशे ते तिनशे रुपये घेतात. तेथुन गांव वसलेल्या तांबड मातिच्या माथेरान पठारावर पोहोचायला दीडेक तास लागतो.डहाणू ते व्ही.टी. १२० कि.मी.लोकल तिकिट ३५ रू,व्हीटी ते नेरळ अंतर १०० कि.मी.लोकल भाडे ३० रूपये.नेरळ ते माथेरान ७ कि.मी.शेअर टॅक्सि प्रत्येकि ८० रूपये.मिनी ट्रेन प्रत्येकी ७५ रूपये.
     माथेरान,तालुका कर्जत,जिल्हा— रायगड.
     सर्व प्रकारचे खाणेपिणे मिळते,२५% महाग आहे.
     अाम्ही राहिलो तेथे दोघांचे स्वतंत्र,सेल्फ कंटेंड,वातानुकुल रूममध्ये राहणे,शाकाहारी भरपुर जेवण,चहा—काॅफि,नाश्ता ,स्विमिंग,वाय फाय ईत्यादी सोईचे २४ तासाला २४०० रूपये.सर्व खर्च दयाळु साहेबांचा.
(२)
     २३ फेब्रुवारी २०१७ ला संध्याकाळी ६ वाजता आम्ही निसर्गरम्य माथेरानला पोहोचलो.कन्याकुमारी पासुन काश्मिर, नेपाळ खाटमांडु पर्यंत फिरुन झालेलं पण डहाणु पासुन जवळच असलेल्या माथेरानला गेलेलो नव्हतो त्याची खंत नेहमी वाटायची. पण एका साहेबांच्या खास निमंत्रणामुळे आम्ही जुने ४ मित्र फक्त सौभाग्यवतींसह माथेरानला गेलो आणि चक्क ४ रात्रि आणि ५ दिवस माथेरानला हुंदडलो.विकास रांजणे हा पदवीधर युवक आम्हाला तेथे गाईड म्हणुन भेटला.पिढीजात गाईडचा व्यवसाय असल्याने विकास मुंबईच्या नोकरीत रमला नाही.त्याने गाईडचाच व्यवसाय करण्याचे ठरविले आहे.पहिल्या संध्याकाळ पासुन शेवटच्या संध्याकाळ पर्यंत त्याने आम्हाला साथ दिली.माथेरानचा निसर्ग,इतिहास,लोक जीवन याची आम्हाला त्याने ईथ्यंभूत माहिती दिली.माथेरानच्या कोना कोपर्‍याची, अत्यंत वाजवी दरांत,त्याच्या खास उमद्या घोड्यांवरुन रपेट घडविली.त्याच्या ओळखिने आम्ही वाजवी दरात खरेदी केली.खाण्यापिण्याच्या चांगल्या जागी मनमुराद खाल्ले पिले.महागड्या हाॅटेलात व पाहुण्यांना ठेवणार्‍या घरातही राहिलो.
     आमचे माथेरानचे दिवस व रात्रि खुपच धुंदीत गेल्या.दिवसभर प्रिय व्यक्ती बरोबर निसर्गरम्य परीसरात हुंदडणे,सर्व नातीगोती विसरुन केवळ प्रेमाचे,मैत्रिचे नाते कुरवाळणे,सार्‍या विवंचना विसरणे,संसारात एक दुसर्‍यासाठी जगलेल्या सार्‍या आठवणींची ऊजळणी करून व्हायची.सर्वजण साठी पासष्टी विसरुन ४० वर्षांपुर्विच्या पंचविशी तिशीत ढकलले गेले होते. संध्याकाळी घोड्यावरुन उतरलेली सर्वांची पावले खाणे,पिणे,मनोरंजन असलेल्या जागी थबकत.बर्‍याच वर्षांनी जमुन आलेली आम्हा घनिष्ठ मित्रांची मैफल कोणात काहीच विधिनिषेध न बाळगता कोल्डड्रिंक,मद्याच्या आस्वादात झिंगायची.मनमुराद खाणे पिणे नाचणे झाल्यावर पावले लाॅजच्या रस्त्याची चढण चढायची.लाॅजच्या रुमचा दरवाजा खोलण्या अगोदर बाहेर ठेवलेल्या सोफ्यावर लवंडायचा मोह सर्वांनाच व्हायचा.समोरच्या कठड्यावर माकड माकडीणीची जोडी आमच्याकडे आशाळभुतपणे पहात राहायची.सौभाग्यवतीने मुद्दामहुन त्यांच्या साठीच आणलेल्या शेंगा फुटाण्याची पुडी माकड टिपाॅयवरुन अलगद उचलुन माकडीणी पुढे सोडत असे.माकडीणीने पहिला बोकणा भरल्याशिवाय तो एक दाणाही ऊचलत नसे.दोघंही दाणे फस्त करुन झाल्यावर कुतुहलाने आमच्या माकडचेष्टा न्याहाळीत.एकमेकात गुरफटलेल्या आम्हाला पाहुन माकडीणी जवळ बसलेल्या माकडाला आपण माकडीणीपासुन अंतर राखुन बसल्याची उगीचच खंत वाटुन तो तिला कवेत घेत असे.मग त्यांच्या मानवलिला सुरु होत असत.दुरवरुन भयाण नेत्रव्दयाने हे न्याहाळणार्‍या घुबडाला हे पाहणे पसंत पडत नसावे म्हणुन तो मोठ्याने घुत्कारत असे.त्या कापर्‍या भयाण आवाजाने दचकुन सौभाग्यवती रुममध्ये जायला ऊठत असे.
     बाहेरुन पक्षांचा मंजुळ किलबिलाट कानी पडताच रात्रभर न निजलेले आमचे चारही डोळे काचेची तावदाने न्याहाळत असतांना त्यांना पहाटेची प्रभा फाकत असताना दिसत असे.
     "चला,निजुया, मी तर आत्ता खुप थकले!,म्हणत सौभाग्यवती अंगावर रेशमी चादर ओढुन घेत असे.
     माझे मन त्या मंतरलेल्या दिवसाची धुंद मादक रात्र कशी गायब झाली याचा विचार करत पडत असे.
     पदवीधर गाईड/मित्र विकास रांजणे फेसबुकच्या माध्यमातुन संपर्कात आहे.मध्यंतरी तो त्याच्या  पहिल्याच  मैत्रिणीसह फेसबुकवर दिसला.तिच्या कायमच्या सोबतिने त्याच्या जीवनात वसंत फुलणार आहे.
     विकास म्हणाला होता,
     "साहेब माथेरानचा निसर्ग पावसाळ्यातच खरा न्याहाळावा!"
     मी त्या धुंद मादक मस्तावलेल्या पावसाळ्याची चातकाप्रमाणे वाट पाहतोय.

             —समाप्त—

 

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

7 + 2=    get new code
Post Comment