Suhas

Suhas Raut

मी सुहास काशिनाथ राऊत,वयाच्या पासष्टीत आहे.वरोर,तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर हे माझं गांव.वडील कै.श्री काशिनाथ केशव राऊत हे वरोरच्या वाडीआळीतील तर आई कै.सौ.शशिकला (पुर्वश्रमीची मनु पांडुरंग पाटील) ही पण वरोरच्याच पाटील आळीतील.०८ आक्टोबर १९५३ ला वरोरला आजोळी माझा जन्म झाला.आम्ही ३ भाऊ,३ बहिणी.माझा नंबर तिसरा.त्या वेळी "हम दो!हमारे दो!"चा नारा नव्हता.नाहीतर माझा तिसरा नंबर लागलाच नसता. वडील राज्य पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक,नोकरीच्या अखेरच्या कालखंडात शिक्षण विस्तार अधिकारी होऊन सेवानिवृत्त झाले.आई गृहीणी.वडीलांना समाजसेवेचीही आवड होती.आम्ही सोमवंशी पाठारे क्षत्रिय ( वाडवळ) समाजातले.सदर समाजाचे अध्यक्षपदही वडीलांनी भुषविले.वडील अभ्यासात हुशार होते.पुर्वीच्या फायनल ( ईयत्ता ७ वीच्या) परीक्षेत ते ठाणे जिल्ह्यात प्रथम आले होते,तर प्राथमिक शिक्षकांच्या पी.टी.सी.(आताच्या डी.एड.समकक्ष) परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले होते.त्यांना लेखनाची आवड होती.त्यांच्या २५० कथा,कविता,लेख,२५ नियतकालिकांतुन प्रसिध्द झालेल्या आहेत. मला लेखनाचा वारसा त्यांच्या कडुनच लाभला.वडीलांच्या नोकरी निमित्त आम्ही वरोर,निर्मळ,सातपाटी,तलासरी,बोर्डी,चिंचणी येथे राहिलो. माझे प्राथमिक शिक्षण वरोर व तलासरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत,तर माध्यमिक शिक्षण ठक्करबाप्पा हायस्कुल,तलासरी व के.डी.हायस्कुल,चिंचणी येथे झाले.खासदार कै.श्री चिंतामण वनगा हे माझे वर्गमित्र,आम्ही तलासरीला ईयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंत एका वर्गात शिकलो.एफ.वाय. व इंटर आर्टसला मी मुंबईच्या पार्ले काॅलेजला होतो. परिस्थितीवश नोकरी करणे भाग पडल्याने मी एप्रिल १९७४ ला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मिळालेली निम्नस्तर लिपिकाची पहिलीच नोकरी पकडली.पुढील शिक्षण बाहेरुन करण्यासाठी पुणे विद्यापीठ तसेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रवेश घेतला पण संसार व नोकरी या मुळे बी.ए.होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पेण,डहाणु,तलासरी,पालघर,बोईसर,वसई येथे ३७ वर्षे नोकरी करुन आॅक्टोबर २०११ ला ऊच्चस्तर लिपिक पदावरून सेवा निवृत्त झालो.सेवानिवृत्ती नंतरही ५ वर्षे जानेवारी २०१६ पर्यंत विद्युत मंडळात बाह्यश्रोत पध्दतीने काम करीत राहिलो.जुलै २०१६ पासुन एका सुरक्षा एजन्सीत काम करीत आहे.सध्या डहाणु पुर्वेला कॅनरा बॅंकेत आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी १४ आॅक्टोबर १९७५ ला नरपड, (दक्षिण आळी)तालुका—डहाणु,जिल्हा—पालघर येथील कु.कल्पना अरूण पाटील,त्या वेळचे वय वर्षे १६ हिच्याशी प्रेमविवाह झाला.एक मुलगा वय वर्षे ४१ व एक मुलगी वय वर्षे ३८ आहेत.दोघां कडुन वय वर्षे १३ व वय वर्षे ३ चे नातु आहेत. २५ वर्षे वाणगांवला वास्तव्य होते ११ वर्षांपासुन डहाणुला वास्तव्य आहे. वयाच्या १८ व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिध्द झाली.आज पर्यंत २५ नियतकालिकांतुन १०० च्या वर कथा,कविता,लेख व स्फुट लेखन प्रसिध्द झाले आहे. वाॅटसअप व फेसबुकवरही मराठी व बोलीभाषा वाडवळीत लेखन करतो.दिनांक २८ जानेवारी २०१८ ला सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ ट्रस्ट फंडाचा "सौ.जया लीलाधर चौधरी—पुरस्कृत लेखक/ कवी प्रोत्साहनपर गुणवंत गौरव पुरस्कार"मिळाला आहे. —सुहास काशिनाथ राऊत/ वरोरकर,डहाणु,09923004895.

मायं वाडवळी कथन-"आमशी फसलेली गटारी !"

1746

मी मायबोली मराठी तसंच बायबोली वाडवळीत कथा, कविता,लेख,स्फुट लेखन करतो "वाडवळ कट्टया"वर गटारी निमित्त आयोजीत कथास्पर्धेसाठी मी लिहिलेल्या बायबोली वाडवळीतील कथेला पहिले बक्षिस मिळाले.
              :भाग—१:
         "आमशी फसलेली गटारी!"
          लेखक:—सुहास काशिनाथ राऊत
           (वरोरकर),डहाणू.
           मोबाईल:—९९२३००४८९५.

     १६ एप्रिल १९७४ ला मी लाईटशा खात्यामन कारकून पदावर नोकरीला लागलो.मायी पयली नेमणूक होती पेणला.तय ३६ दिहीस मीन काम केलं.तवा कमार्‍याये मुंबयला रेणारे श्री लिलाधर त्र्यंबक चौधरी भाऊ आमशा खात्यात दादरशा हाफिसात होते.त्यांशे भोट्या सायबा बरोबर घणेस बरे संबंध होते.त्याईन मायी बदली बीन अर्जानं डहाणूला करून दिली.२२ मे १९७४ ला मी डहाणूला हजर झाल्यावर बदलीया अर्ज दिला.
     डहाणूला आल्याया पयल्या दिहापासून मी नरपडला आताया दक्षीण आळीत (तवाई हड्डे पखाडी) माया सख्या सखू मावशीया घरात रेत होतो.
     तवास मला माया मावशीये सख्ये दीर श्री अरूण महादेव पाटील(टोपण नांव पी.अरूण)यांशी पोरगी कल्पना भेटली.ती तवा होती १५ वहरायी न मी  होतो २१ वहराया.ती कोसबाडशा मेरे खेड पाड्याला त्यांशा कुटूंबाबरोबर रेवून बोर्डी हायस्कूलला ९ वीत भणव्या जात होती.
      १९७४ शा मे मयन्यात आमशा दोगांया जीवनात प्रेमाया वसंत फुलला न नरपड—डहाणूशा धुंद रूपेरी समुद्र किनार्‍यावर आमस पयलं प्रेम फुलत जाऊन १४ आॅक्टोबर १९७५ ला दसर्‍याया दिही आमी रजिस्टर पध्दतिनं डहाणू किल्ल्यावरशा कोर्टात लग्नाया बेडीत अडकलो.तवा मी एकदम नास्तिक होतो,भगून मीन देव,रूढी,परंपरा झुगारून दिल्या न लग्न रजिस्टर पध्दतिनं केलं.आता मात्र मी पूर्ण आस्तिक हाय,हकाळ हकाळी देवाला पाया पडल्या शिवाय घराया बायेर पडे नय.
     आयबाबाया घणास लळा भगून मीन जूलै १९७४ ला आयबाबा तलासरीला रेतोये तय बदली घेतली.तय आमी जकले एकत्रस रेत होतो.आमी रेतोये त्या घराया पुडशास घरात आमाहाटी स्वतंत्र खोली होती.
     सन १९८० ला आयबाबा वरोरला गेले भगून मीव बोयसरला बदली घेऊन बायको न  दोन पोरा हगट आयबाबाला गरज नहताना त्यांशा बरोबर रेव्याहाटी वरोरला बिराड घेऊन गेलो.

              : भाग—२:
     वरोरसं आमसं घर घणसं हाकड.१० फूट रूंद न ८० फूट लांब.जणू आगगाडीया डब्बास!(अहं माया भोटा भाहा प्रकाश नेहमी हांगव्या)तय रेव्याला घणीस अडसण होती.न वरोरहून बोयसरला नोकरीला जाणंयेणंव बरंस अडसणीयं होतं.या कारणास्तव मीन वरोर होडव्याया निर्णय घेतला.
     तवा पंडीत नांवाया एक इंजिनिअर आमशा सिसणीया हापिसात सायेब होता.त्याला मीन मायी अडसण हांगटल्यावर त्यानं सिसणीया बामण वाड्यात एक खोली शोधून दिली.पण हांगटलं,
     "खोली बामणायी हाय,तय कव्वास मावरं,मटण खाता येणार नय,मालक भट हाय,तो एकदम कर्मठ बामण हाय,सुकून तातं जरी खालं ते काळवेळ न पावता घराबायेर सामान फेंकून देवून हांकलून देन,"
     आमाला जकल्या अटीं मान्य होत्या.दोन बैल गाड्यांत वरोरसं आमसं जकलं सामानसुमान भरलं न अंता नानाया गडी गोकुळ्या न हरिकाका बैलगाड्या घेऊन सिसणीया वाटेला लागले.
     मी, बायको न पोर,पोरी आमी आयबाबाया निरोप घेवून सिसणीला जाव्याहाटी निंगालो.माया आयबाबाया डोळ्यात पाणी आलं.आमशाव डोळ्यांत पाणी आलं.पण माया आयबाबाये अश्रु केवळ दु:खाये होते,आमशे अश्रु मात्र दु:ख न आनंद मिश्रित होते.
     सिसणीया बामणवाड्यात एस.टी.नं पोसलो.बैलगाड्या आदिस पोसल्या होत्या.त्याईन बामणाया ओटयावर आदीस सामान उतरवून ठेवलं होतं.गोकुळ्या न हरिकाका भाड्याये पैसे घेवून"सुकात र्‍या!"अहं हांगून वरोरशा वाटेला लागले.
     आमशा हातात खोलीयी सावी ठेवत घर मालक जोशी तात्या बोलले,
     "या घराया मंगाराइ आमसं बिजं घर हायं त्यात तुमशी खोली हाय,त्यात तुमी आता पासून बामणावाणी रेव्यायं.अटे मावरं,मटण,ताती फाती कायस खाव्यायी नय.आदीस दोन खोल्या भाड्यानं हात तय ,त्यात एकात वाडवणशा सोकाराया पोर्‍या हात दोन न बिज्यात जळगांवस चौधरी नावायं जोडपं हाय.जकले मजेत रेतात बामणावाणी,तुमीव र्‍या तहेस!"
     आमी बारक्यापणापासून वरोर पासून दूर न सहजासहजी मावरं न मिळणार्‍या ठिकाणी रेल्यामुळे मला मावर्‍यायी तवडी सटक नवती.पण कल्पनायं तहं नवतं.तरीपण हाऊ पासून दूरशा House मन हौशेनं रेव्या मिळणार भगून ती खुष होती.
     घर मालक बामणायी लगीन झालेली दोन पोरं होती.ते जकले आयबाबा बरोबर  एकत्रस रेत.एक दिही त्यातला बारका पोर पवीभाऊ आला न माया बायकोला बोलला,
     "वयनी, अटे जीव मारून रेव्यायी कायस आवश्यकता नय,घरशे लोक अदून मदून बाहेर गांवी जातात तवा बिनधास्त मटण,मासे आणून खा.एरवी गुपशूप अंडी खाल्ली तरी सालतिल.दूहरे भाडोत्री पण अहेस करतात,स्वताव खातात न मलाव देतात आणि मी पण डहाणू खाडीला शिक्षक हाय,माये विद्यार्थि मला चांगले मासे मिळालेका आणून देतात,ते मी भाडोत्र्यांकडे आणून देतो  आणी मस्त ताव मारतो त्यांच्या बरोबर.
     बामणाया नव्या पिढीयं मला कौतुक वाटलं.मंग आमी अधून मधून अंडी आणून खात न त्यायी हालं कंपाउंड बायेर बिज्या बामणाया वाड्यात टाकत.
     एके दिही घरमालक जोशी तात्या सवताळूनस आले न तिनव्या भाडोत्र्यांना एकामेरे वारून विसारव्या लागले,
     "अंडी कोण खाते रे आपल्या घरांत?"
     "छे तात्या,आमी ते शुध्द शाकाहारी झालोत तुमच्या संगतीत.अंड्यालाही शिवत नाही कोण. "मी म्हणालो.
     बामण जोशीतात्या आमशावर अविश्वास दाखवत बोलले,
     "मंग शेजारशा बाबरेकराया वाड्यात अंड्यायी हालं कोण फेंकतो? त्याईन माया मेरे तक्रार केली हाय."
     आमी जकले भाडोत्री गप्प!
     दूहर्‍या दिहा पासून मायी बायको अदून मदून जेवणाया डब्याबरोबर मला एक दूहरी पिशवीव देव्या लागली,त्यात आमीन खाल्लेल्या अंड्यायी हालं अहत.ती मी हापिसला जाताना रस्त्यात कसर्‍यात फेंकत अहे.
     अहे "हाला"त दिही सालले अहता अहेस आषाढाये दिही आले.

               :भाग—३:
    
     एक दिही रातसा बामणाया मास्तर अहलेला बारका पोर आमशा खोलीत आला.दूहर्‍या दोगव्या भाडोत्र्यांना त्यानं मला आमशा खोलीत वारव्या हांगटलं.जकले जमले,तो बोलला,
     "या वहरा आपण गटारी करव्याहीस!"
     ते ऐकून ते आमी जकले ताडकन उडलेस.मला ते त्याहा कर्मठ बाबानं आमसं जकलं सामान आमशा हगट गटारात फेंकून दिल्यायं शित्रस हमोर दिखलं.
     "ये पावा,बिलकुल घाबरू नका!श्रावणाया पयल्यास दिही आमशा घरामेरशास आमशा देवळात हकाळ पासून पूजेया कार्यक्रम अहतो.त्या हाटी गटारीया राश्शेस जकले जण तय जाउन उत्सवायी तयारी करतात.न या वहरा ते पयलास दिही श्रावणी सोमवारसा हाय.तवा आपण घरात मटण,कोंबड कायव हिजवलं तरी कोणशा नाकात वास जाव्या नय.
     "मी चिकन घेउन येईन बोयसरहून"मी बोललो.
     "मी काशाहून मटण आणीन,चांगलं बकर्‍यायं मटण मिळते तय,मटणवाला ओळखिया हाय माया,मी नेहमी तयसनस मटण आणतो."चौधरी बोलले.
       "खात्रीयं देतो तो, हिजतेव मस्त"चौधरी वयनीनं पुस्ती जोडली.
     "आमशा घरा डझनभर ताती हात ,आमशा बायजून दिलेली"सीता बोलली.
     "अस्सल गांवठी"गितालाव रेवलं नय.
     "मीव पोरांमेरे डहाणू खाडीवरसं मस्त मावरं मांगून आणतं"बामणाया बारका पोर मास्तर पवीभाऊ बोलला.
     "तुमी घेता का?"तोंड वाहून आंगठा हमोर धरत पवीभाऊनं मला विसारलं
     "कवा! कवा !"मीन खाली नजर टाकत लाजतस कबूल केलं.
    "मी घेऊन येईन व्हिस्कि"मीन पुडे हांगटलं.
     "नको ,मी आणतो काशाहून जांभळायी!व्हिस्कि झक मारते तिया पुडे."चौधरी बोलले.

          :भाग—४:

     दूहर्‍या दिहा मीन बोयसरला जाऊन चिकन न व्हिस्कियी बाटली आणली.चौधरीनं फटफटीवर काशाला जाऊन बकर्‍यायं मटण न जांभळायी अस्सल दारू आणली.बामणाया मास्तर पोर पवीभाऊ डहाणू खाडीवर गेला न मस्तपैकी मावरं घेऊन येवून माया बायकोमेरे पिशवी देवून गेला.
     मायी बायको कल्पना,त्या सोकाराया दोन जुळ्या पोर्‍या सीता न गीता,न चौधरी वयनीनं चिकन,मटणाया भाज्या तयार करून मावरं मस्तपैकी तळून जकला स्वयंपाक  करून ठेवला.
     आमी हांज होवव्यायी वाट पावतोये.अंदार होत सालला,आमी ओट्यावरशी लाईट मुद्दामस बंद ठेवलोयी.आमी तिनव्या खोलीतले भाडेकरू टाईमपास करव्या हाटी ओट्यावर वार्ता करत बहलोये.आमसा पोर स्नेहशील न पोरी स्वप्नमाला घरात टी.वी.पावत बहलोये.
     अवड्यात अंदारासन एक पांडर्‍या कपड्यातली आकृती पुडे आली.
     "आले,पवीभाऊ आले!"चौधरी उत्साहात बोलले.आमी सावरून बहले,तवड्यात मेरे येत ती व्यक्ती बोलली,
     "मी पवी भाऊ नय,तात्या हाय!पवी गेलाय गांवात,कोणी जेवव्या वारटलंय त्याला तय.आणी अंदारात कां बहलेत जकले?आज ओमवाशाये दिवे लावव्याये होडून?"
     गीतानं ओट्यावरसं लाईटसं बटण दाबलं,लख्ख परकाश पडला,आमशे जकल्याये चेहरे मात्र त्यात पावव्या हरके दिखत होते.
     "पोरांनो काय पावतात रं टी.वी. वर?तात्यानं आमशा घरांत डोकावत आमशा पोरांना विसारलं.
     "तात्या शिनेमा लागलाय मराठी,मुंबईचा जांवई"पोरं बोलली.
     "व्वा!व्वा!"मणत तात्या चक्क खोलीत घुसले आमशा.तयशा आराम खुरशीवर स्थानापन्न होत त्याईन पुडशा टीपाॅयवर तंगड्या पसरल्या.पोरं हावरून बहली.
     "मुंबईचा जांवई" यो तात्याया आवडता शिनेमा.त्यात रामचंद्र वर्दे यायीन केलेली कर्मठ माहणायी भूमिका मणजे चक्क तात्याई प्रतिकृतीस.भगून तात्याला तो शिनेमा ज्याम आवडे.
     "जेवणं झाली कां रं तुमशी?"तात्यानं शिनेमा पावता पावता विसारलं.
     "आमीन आज जेवणाया कंटाळास केलाय,यांशा पोटात बरं नय,आज दूद सपातीस खाव्या हात आमी"मायी बायको उत्तरली.
     "अरे, मंग खाऊन घ्या ,मी शिनेमा पावत बहतं अथीस.मस्त शिनेमा हाय यो!"अहं हांगून तात्यानं तयस ठाण मांडलं.
     मायी बायको जड अंत:करणानं रान्नीत गेली.सपात्यायी सवड न दूदाया टोप घेउन बायेर आली.रोजशा शिरस्त्या प्रमाणं वाडून झाल्यावर मीन भोट्ट्यानं हाळी दिली,"सला चौधरी भाऊ,चौधरी वयनी,सीता,गीता या जेव्व्याला!"
     "हो जेवा तुमी,आमी पण बहतोस जेव्व्याला!"बायेरून चौधरी,चौधरी वयनी,सीता,गीता बोलल्या.
     "अवो चौधरी वयनी,तुमीन आज सपात्या नय केल्या हांगतोया नं?खमा मी आणून देते सपात्या, मीन जास्त केल्यात."अहं हांगून मायी बायको परत उठून रान्नीत गेली,न टोपात सपात्यायी सवड टाकून बायेर चौधरी वयनीला न सीता न गीताला देवून आली.
     बायकोनं कोपभर दूद तात्याला दिलं.आमीन दूदा बरोबर सपात्या कह्याबह्या घशात लोटल्या.पोराईन पण गुपसूप खाउन घेतलं.
     शिनेमा खपला तहा तात्या ऊठला,राश्शे दहा वाजलोये.पवीभाऊ तात्याला खोळत आला.
     "आला कां रे जेऊन ?"तात्यानं त्याला पावतास विसारलं.
     "हो हो"तो उत्तरला,पण त्याया बोलण्यात जग नव्हता.
     "सल मंग घरा निजव्याला,उद्या पातेरातीस उठव्या हाय.यानाव निजून दे आता"अहं हांगून तात्या पवीभाऊला आल्या पावली परत घेऊन गेले.
     ते गेल्यावर गीतानं ओट्यावरशी लाईट घालवली.आमी जकले भाडोत्री ओट्यावर जमा झालो.
     "आमी दूदा बरोबर सपात्या खाल्ल्या"मायी बायको बोलली.
     "आमी शात बुडवून"सीता बोलली.
     "आमी लोणश्या बरोबर"चौधरी वयनी बोलल्या.
     न आमी जकलेस हाहून पडलो,न निजव्या गेलो.

          :भाग—५:

     दूहर्‍या दिही हक्काळीस तात्या दारात परत हजर.
     "पाठवारे तुमच्या बायकांना आमच्या देवळात पूजेला"त्यायीन फर्मान होडलं.आणी तुमी पण या ग त्यायीन सीता न गीतालाव हांगटलं न ते गेले.बायका पूजेयं ताट भरव्या घरांत गेल्या.
     तवड्यात पवीभाऊ आले.
     "अरे कालचं चिकन,मटण,मासे काय शिल्लक ठेवलाय कां नाय?जाम भूक लागलाय.तात्या बहलोये भगून काल अटे येता आलं नय,या शिसणीत रातसं काय मिळेव नय.वाणगांव नाक्यावर शेट्टीया हाॅटेलात जाऊन दोन थंड बटाटे वडे न दोन बाशे पाव मिळले तेस खाऊन रेलोय."
     जकले आमशा खोलीत आले.बायकांनी चिकन मटणाया भाज्या न तळलेले मासे आमशा पुड्यात आणून ठेवले आणी म्हणाल्या,
     "खा तुम्हीस,आमसा आज सोमवारसा उपास आणी आम्ही श्रावण पाळणार  हात."
     आमा पुरूषांना वाईट वाटलं.त्या जकल्या जणी पूजेयी ताटं घेवून बायेर निंगाल्या.आमी जेवणायी ताटं घेउन बहलो.
     पवी भाऊनं चिकन,मटण,मासे ताटात वाडले.
     चौधरीनं ग्लासात जांभळाई दारू ओतली.
     मीन त्यात कोकाकोला ओतला.
     न श्रावणाया पयल्या दिहाला,कर्मठ बामणाया घरात,बामणाया पोरा बरोबर आमी, आमशा बायकांयी न त्या दोन पोरींयी आठवण काडत काडत आमशी फसलेली गटारी साजरी करव्याला सुरूवात केली.

                *** समाप्त ***

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

5 + 5=    get new code
Post Comment