Kundan

Kundan Raut

कुंदन मधूकर राऊत शिक्षण दहावी, आठ वर्ष भारतीय सैन्यात होतो. लवकर सैन्य सेवा सोडली(कायदेशीर). आल्यावर काही वर्ष बांधकाम साहित्य पुरवण्याचा व्यवसाय केला व नंतर बांधकाम स्वतः व्यावसायिक पण होतो व एका बांधकाम कंपनीतही काम केले. सात आठ वर्षापूर्वी जेष्ठ पर्यावरण तज्ञ Adv. गिरीश राऊत ह्यांच्या संपर्कात आल्यामुळे तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) नीट समजली . खरी गंभीरता समजल्यामुळे सर्व काम बंद करून निसर्ग शेती करतो. पर्यावरण आरोग्य व निसर्ग शेती शाळा,महाविद्यालयात, सभेत जावून समजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. शिवाय लहान मुलांना व्यायाम, तसेच तरुण मूल व मुलींना सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण ही विनामूल्य देतो.

थाटात लग्न म्हणजे सर्वात मोठे विघ्न

727

थाटात लग्न म्हणजे सर्वात मोठे विघ्न व इतर सर्व सण समारंभ म्हणजे पण त्रास ताणतणाव आहे. म्हणून सुखात शांतीत,समाधानात जगायचे असेल, अन्याय,अत्याचार, गुलामी ,लाचारी पासून दूर राहायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळा सर्व सण समारंभ साधेपणाने साजरे करूया. 
     

शांतपणे विचार करा आपण लग्न,समारंभ(लग्न,बारावे, वर्ष व इतर) साजरे करतो,गिफ्ट,रिटर्न गिफ्ट, सोन देणं घेणं, वस्तू देण घेण अनावश्यक वस्तू खरेदी , मोठमोठी घर बांधतो,  ह्यासाठी आयुष्य पणाला लावतो ,त्रासात,प्रदूषणात काम करतो तेही वेळी अवेळी. वेळेवर जेवण नाही की झोप अश्याने लवकर गंभीर आजार जडतात व जीवनात माणूस लवकरच दुःखी होतो . काय फायदा अश्या जीवनाचा. थोडक्यात काय तर साधेपणातच सुख असते हे आपल्या लक्षात आले पाहिजे. आपण आपल लग्न साधेपणातच केले , व इतर सण समारंभही. तर आपल्याला अनेक वर्षे लाचारी गुलामीत जी काम करावी लागतात ती करावी लागणार नाहीत. हे सर्वांना ताबडतोब जरी शक्य नसले तरी लवकरच स्थिरस्थावर होवू शकतो. आपण नोकरी किंवा व्यवसाय करतो त्यातील 80% पेक्षा जास्त कमाई ह्या लग्न व इतर सण समारंभासाठी उत्सव नावाच्या अनावश्यक गोष्टी साठी खर्च करतो. म्हणजे हजारो दिवस काम करायचे व एका दिवसात गमवायचे. जेव्हा काही शहाणी लोक इतरांना बोलतात आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. लग्न साधेपणातच साजरे करा तर समोरच्या व्यक्तीचे उत्तर हे असते की लोक हसतील . तर आपण लोकांच्या हसण्याकडे लक्ष द्यायचे नाही कारण हसणारे महामूर्ख असतात तर काही लबाड किंवा शत्रू असतात.
 

शांतपणे विचार करा आपलं जीवन श्रीमंत लोकांना मोठ करण्यासाठीच आहे का? म्हणजे हजारो दिवस काम करून  पैसे कमवायचे व एक दिवसात उडवायचे/संपवायचे व  साठ वर्षापर्यंत काम करायचे. व्यापाऱ्यांना श्रीमंतांना माहीत आहे हे अश्याच प्रकारे पैसे संपवून नाईलाजाने आपल्याचकडे मरायला(कामाला) येणार.पाळीव प्राण्यासारख गुलामीत लाचारीत, ताणतणावात काम करायची ते फक्त सण, समारंभ साजरे करण्यासाठीच का?  आपल्याला हे समजल आहे पण लोक काय म्हणतील ह्या विचाराने लोक हिम्मत करत नाही. ज्यांच्यातून हे घडल त्यांनी असा विचार करायला हवा आपण तर अनावश्यक त्रास काढला पण आता आपल्या पुढील पिढीला तरी ह्या त्रासातून वाचवू. म्हणून सरसकट सर्व सण समारंभ,लग्न ,हा दिवस तो दिवस सारखे समारंभ साधेपणातच साजरे करूया, न केल्यास उत्तमच , कारण साधं करताना हळूहळू आपोआपच थाटमाट वाढतो. म्हणून आपण सरसकट सर्व सण समारंभ साधेपणातच साजरे करू व कुणी साजरे न केल्यास त्याला हसू नये . संतांनी सांगितले आहे साधेपणातच सुख असते. इच्छांपासून मुक्ती म्हणजे खर स्वातंत्र्य कारण माणूस इच्छा पूर्ण करण्यासाठी गुलामी लाचारीत जगतो. 
     

माझा आता प्रामाणिक प्रयत्न आहे की हे करायचे नाही केल्यास कमीतकमी खर्चात साधेपणातच, माझा हाही प्रयत्न आहे कुणाकडे अश्या थाटामाटात होणाऱ्या लग्न व इतर समारंभात भाग न घेण्याचा. शांतपणे विचार करा आपण आपली मूल म्हणजे श्रीमंत लोकांकडे आयुष्यभर मरण्यासाठीच म्हणजे काम करण्यासाठीच आहेत का? भारतातील कोट्यवधी सर्वसामान्य व गरीब लोकांच्या जमिनी विकल्या गेल्या त्याची अनेक कारण आहेत त्यापैकी सर्वात मोठं कारण म्हणजे थाटात लग्न, जमिनीवर कर्ज काढून ते भरता येत नाही अश्यावेळी सावकार, बँक, पतसंस्था जप्त करते. अश्या कारणांमुळे लाखो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, अनेकांची हत्या झालीआहे. आजकाल बहुतेकलोक लग्नात दारू ठेवतात त्यामुळे अप्रत्यक्षपणे व्यसनाला प्रतिष्ठा देण्यासारखेच झाले आहे म्हणून समाजात व्यसनाचे प्रमाण खूप वाढले आहे. यकृत खराब होणे, tb (क्षय) होणे, इतर गंभीर आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. तरुण लवकर मरत आहेत, कमी वयात मुली विधवा बनत आहेत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. नेहमीच बाहेरचे अन्नपदार्थ खाल्यामुळे लवकर आजार जडतात, आजकाल आठवड्यातुन अनेकवेळा कुठे ना कुठे लग्न, वाढदिवस, इतर सण, कुठल्यातरी कारणांची पार्टी अवेळी व अशुद्ध खाणे जागरण ह्या कारणाने पण आजार वाढले आहेत. शांतपणे  विचार करा. सर्व सण समारंभ साधेपणातच साजरे करून सुखी समाधानी व्हायचे की थाटामाटात साजरे करून सर्व पैसे गमावून कामच करत मरत मरत कर्जत, गुलामीत लाचारीत, ताणतणावात जगायचे? तुम्हीच ठरवा. 

 

कुंदन मधुकर राऊत

(नरपड)

Publish on your social media channel through the share buttons available on this page only.
Your Comment
Max 350 Characters | Login required to post comment

1 + 0=    get new code
   
Post Comment