Trust Community तेथे कर आमुचे जुळती

अॅड. श्री. लक्ष्मण पांडुरंग पाटील

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वरोर व चिंचणी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ख्यातकीर्त वकील म्हणून ते नावारुपाला आले. युवकांसाठी युक्रांद या संस्थेची स्थापना आणि भरभराट होण्यास त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांची सांस्कृतिक जडणघडण राष्ट्रसेवा दलातून झाली. समाजवादी चळवळीत कार्यरत असतानाच ते साने गुरुजी विद्यालयाचे विश्वस्त व चिटणीस होते. अनेक सामाजिक संस्थांवर त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले आहे.

वरोर येथील शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यामंदिराचे ते आद्य संस्थापक होते. तसेच संस्थेला उर्जितावस्था मिळवून देण्यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. सो. पा. क्ष.स. संघात शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. तसेच १९६८ साली झालेल्या दादर अधिवेशनात आणि १९९० साली झालेल्या घिवली अधिवेशनात ते अध्यक्ष होते. १९९६ साली त्यांना राजाराम पाटील सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन संघाने त्यांना ३० जानेवारी २००० रोजी मानपत्र देऊन सन्मानित केले.