Culture & Tradition Culture & Tradition अक्षय तृतीया  (महिना : वैशाख)

Akshay-Trutiya

साडेतीन मुहुर्तापैकी दुसरा मुहूर्त म्हणजे भारतीय सौर वर्षाच्या दुसऱ्या (वैशाख ) महिन्याची शुद्ध तृतीया.सण नसला तरी सणाएवढचं महत्व हिंदुधर्मात ह्या दिवसाला आहे. ह्या दिवशी केलेले कोणतेही कार्य किंवा संकल्प अक्षय (कधीही नाश न पावणारे) असतात. म्हणुनच हिंदू धर्माने मंगलमय मानलेल्या ह्या दिवशी सुद्धा गुढीपाडव्या प्रमाणे सर्व मंगलविधि ठरविले जातात. घरची गृहलक्ष्मी अक्षय (तुकडा न झालेले) तांदुळ हळद कुंकुवाने मिश्रित अभिमंत्रित करून घरातील कपाटे, संपत्ति, भाताचे कणगे, पशुधन आणि घरातील सर्वलोक ह्यांना अक्षय आणि सुखी ठेव असे जगनियंत्या श्री विष्णुला आवाहन करुन त्याच्या चरणी अर्पण करते.

हा दिवस सात चिरंजीवांपैकी एक आणि श्रीविष्णुचा सहावा अवतार मानल्या गेलेल्या आचार्य भगवान परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो.

ह्या दिवशी जन्मल्यामुळेच कदाचित प्रभु रामाने परशुरामाच्या स्वर्गाची वाट आपल्या बाणाने बंद करून त्याना चिरंजीवी केले असावे.