Chaukalshi Vadval
  • Login

    Authorised Member's Login Area

    Enter Username
    Enter Password
    New User
    Generate Pin

Change Password

Current Password * Enter Your Current Password
New Password * Enter New Password
Confirm New Password * Re-Enter New Password
The Confirm New Password must match the New Password.
  • CommunityTrust
  • HistoryHistory
  • AchieversAchievers
  • VillagesVillages
  • Culture & TraditionCulture & Tradition
  • RecipesRecipes
  • SportsSports
  • BlogsBlogs
 Sub Menu
  • Introduction
  • गुढी पाडवा
  • घरजत्रा
  • अक्षय तृतीया
  • वट पौर्णिमा
  • दिव्याची अवस - दीप अमावस्या
  • देवशयनी (आषाढी) एकादशी
  • नागपंचमी
  • नारळी पौर्णिमा
  • रक्षाबंधन
  • जन्माष्टमी आणि गोपाळकाला (गोकुळ अष्टमी)
  • बैल पोळा
  • पिठोरी अमावस्या
  • गणेशोत्सव
  • गौरी पूजन
  • पितृपक्ष
  • शारदीय नवरात्रौत्सव
  • दसरा - विजयादशमी
  • कोजागिरी पौरणीमा
  • आठोंडा
  • दीवाळी/दीपावली
  • मकरसंक्रात
  • माघी गणपती
  • महाशिवरात्री
  • होळी
  • कुलदैवतं

Culture & Tradition Culture & Tradition वट पौर्णिमा  (महिना : श्रावण)

संकलनः श्री. तरंग जयप्रकाश पाटील

Vat_Purnima

भारतीय सौरवर्षाच्या तिसऱ्या म्हणजेच जेष्ठ महिन्याच्या शुद्धपक्षाच्या पौर्णिमेला भारतीय स्त्रिया सर्वत्र हा सण साजरा करतात. सुवासिनी स्त्रियांच्या नजरेत हा सण अतिशय महत्वाचा आहे. त्या आपल्या पतीला दीर्घायुषी होता यावे म्हणुन हिंदुंना पवित्र असलेल्या वड (वटवृक्ष) ची पूजा बांधतात ह्या वेळी सालंकृत होऊन पूजेच्या तबकात पूजा साहित्या सोबत अनेक फळे घेवुन वटवृक्षाजवळ जावून तेथे ब्राम्हणाच्या पौरोहित्याखाली वटवृक्षाची यथासांग पूजा केली जाते नंतर जन्मोजन्मी हाच पती मिळावा त्याला दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना करून झाड़ाभोवती कच्चा धागा गुंडाळला जातो. त्यानंतर पुरोहिताला त्याची दक्षिणा देवुन पुजा करायला आलेल्या सर्व स्त्रिया एकमेकिंना फळाचे वाण देतात.

हा संपूर्ण दिवस स्त्रिया उपवास करतात. आपल्याकडे वेगवेगळी फळे म्हणजे आंबा, चिकु, जांभळं, करवंद, फणस ही आपल्याकडे त्या काळात उपलब्ध असणारी फळे वापरली जातात. मुळ कथा सत्यवान सावित्री सर्वाना माहीत आहेच. ह्या मागे आपल्या पूर्वसुरींचा पर्यावरणाचा हेतु असावा.वड हा वृक्ष पुरातन आणि दीर्घायु असतो त्याची पुजा केल्याने लोक भावनिक असल्याने वडाची झाडे तोड़णार नाहित पर्यायाने वृक्षसंपदा वाढून पर्यावरणाचा समतोल साधेल असा उदात्त हेतु असावा.

तसेच पूर्वी घरातच अडकुन असणाऱ्या स्त्रियांसाठी शुध्द हवा मिळावी व त्यांचे आरोग्य चांगले राहावे अश्या ऊदात्त हेतूनेदेखिल या सणाचे प्रयोजन केले असावे. कारण त्यावेळी पावसाळी कुंद हवा त्यातच घरातील चुलींमधला धुर यामुळे घरातील स्त्रियांचा जींव मेटाकुटींस आलेला असायचा.

  • Culture & Tradition
  • वट पौर्णिमा
  • © Chaukalshi Vadval. All Rights Reserved.
  • Credits
  • Acknowledgement
  • Sitemap
  • Editorial
  • Powered by Diligence Web Technologies