Culture & Tradition Culture & Tradition मकरसंक्रात  (महिना : पौष)

Makar_Sankranti

सूर्य मकरराशीत जाताना येणारा सुमारे दोन तासांचा पर्वकाळ मकर संक्रमण या नावाने ओळखला जातो. मकरसंक्रात पौष महिन्यात येते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा दिवस असतो. या दिवशी भाकरी,भरीत, उसळी वगैरे खाण्याचा प्रघात आहे. मकरसक्रांतीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे हे दान स्त्रियांनी करण्याचा प्रघात आहे. त्यात सुगड (मातीचे छोटे मडके) यात उसाचे तुकडे, गाजर, चण्याचा हुरडा, बोरे भरून सुवासिनींना दान देतात.

मकरसंक्रात ते रथसप्तमी या काळात सुवासिनी हळदीकुंकु करतात. लहान मुलांना व नवविवाहितांना हलव्याचे दागिने घालतात.पुरूष, स्त्रिया व लहान मुले एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला म्हणून तिळगुळ वाटतात. मकरसंक्रात भारतभर साजरा केला जातो. सौराष्ट्रमध्ये या दिवशी पतंग उडविण्याचा खास कार्यक्रम असतो. तेथे या सणाला 'उतराण' असे म्हणतात. उत्तरप्रदेशात खिचडी म्हणतात. दक्षिणेकडे या दिवशी पोंगल नावाने सण साजरा केला जातो. मकरसंक्रातीचा दुसरा किंक्रांत. या दिवस करीदिन म्हणून मानला जातो.