Culture & Tradition Culture & Tradition गौरी पूजन  (महिना : भाद्रपद)

Gauri-Poojan

भाद्रपद महिन्यात गणपती पाठोपाठ महत्वाचा सण "गौरी"' म्हणजेच पार्वती (गणपतीची माता). हा सण माहेरवाशिणी कडुन आपल्या माहेरी पुजला जातो. अशी प्रथा आहे. पुर्वीच्या काळी स्त्रिया नोकरी किंवा कामधंदा करित नसत .एकदा लग्न झाले की सासरी चुल आणि मूल एवढेच तिचं विश्व मर्यादित असे. आताच्या लग्न झालेल्या मुली जश्या मनात आले की माहेरी येऊ शकतात तसे त्यावेळी नव्हते. सासरच्या परवानगिने कधीतरी सणवराच्या निमित्ताने त्यांना माहेरी येता येत असे. गावची जत्रा होळी गौरी अश्या सणाला त्यांना माहेरी जावयास मिळत असे. गणपति जवळ जवळ प्रत्येक घरी असे त्यामुळ गणपतीला न जाता स्त्रिया गौरीलाच जाणे पसंद करीत. त्याच वेळी त्यांच्या घरची माहेरवाशिण (आत्येसासू, नणंद) आपल्या माहेरी आलेल्या असत. म्हणुनच ही पूजा आपल्या लेकिकडुन करवुन घेण्याची प्रथा पडली असावी. घराच्या ओटी (पडवी) पासुन हळदीच्या हाताने गौरीचे स्वागत करून तिला घरात घेतले जाते.

स्वयंपाक घरात तिच्यासाठी तयार केलेल्या आसनावर विराजमान करून तिची विधियुक्त पूजा करून तिला आवाहन करतात की – हे गौरीमाते आमच्या माहेरी सासरी सर्वांना सुख, आरोग्य, बरकत दे.

कुणालाही दुःखी ठेवू नकोस. रात्रि सर्वजणी जागरण करून भोंडला, घागरी फुंकणे, फुगडया घालणे, एकमेकिंची थट्टा मस्करी करणे असे खेळ खेळले जातात. अशी ही एक आख्यायिका आहे की कैलासाहुन दहा दिवसासाठी पृथ्विवर गेलेल्या आपल्या पुत्राची (गणपती) काळजी वाटून त्याच्या ख्याली खुशाली साठी माता पार्वती पृथ्विवर एक चक्कर मारून जाते.