Culture & Tradition Culture & Tradition नागपंचमी  (महिना : श्रावण)

Nagpanchami

श्रावण मासी हर्ष मानसी--- असे ज्याचे वर्णन बालकवींनी केले आहे तो शुचिर्भूत महीना म्हणजे हिंदुवर्षाचा पाचवा महीना "श्रावणमास". हा महिना सणांचा महीना म्हणून ओळखला जातो. पहिला सण आहे नागपंचमी.

ह्या संदर्भातील श्रियाळ राजा तसेच शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या कथा सर्वाना ज्ञात आहेत. शेतकामातुन थोड़ी विश्रांति मिळाल्याने बळीराजा आणि त्याचे कुटुंब निवांत असतात. साप (नाग) हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. कारण धान्याची नासाड़ी करणाऱ्या उंदरांचा तो नाश करतो. त्याच्याप्रति कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा करण्याचे संकेत असावेत. ह्या सणाला सुवासिंनी तसेच कुमारिका मुली उपवास करतात. दुध आणि लाह्या घेवुन वारुळाचि पुजा करतात (त्यात साप वास्तव्य करतो म्हणुन) दुध लाह्यांचा नैवेदय दाखवतात. त्याला विनंती करतात की आम्हा सर्वांचे आमच्या कुटुंबीयांसह रक्षण कर.

झाडावर झुला बांधुन झोके घेतले जातात. ह्या दिवशी वेगवेगळ्या मोड़ आलेल्या कडधान्यांची एकत्रित भाजी करून ती भोजन करताना खाल्ली जाते. कारण ही सर्व कडधान्य शेतात पिकवली जातात आणि उंदरांपासुन नागोबां त्यांचे रक्षण करतो असा समज आहे.