Culture & Tradition Culture & Tradition शारदीय नवरात्रौत्सव  (महिना : चैत्र)

Navratri

आश्विन महिन्याच्या शुध्द प्रतिपदेला वर्षाऋतु संपुन शरद ऋतु आणि नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. म्हणुन ह्या सणाला शारदीय नवरात्रौत्सव म्हणतात. शेतीची पावसाळी कामे संपवुन वर्षा ऋतू पुढील कार्याची सूत्रे शरदऋतुकडे सोपवतो. ह्या वेळी सृष्टि शारदा हिरवीगार आणि प्रसन्न दिसते. सुखदायिनी वरदायिनी आणि सस्य शामल असते. ह्या काळात वनस्पतिची सर्वार्थाने वाढ होत असते. देवीचे प्रतीक म्हणुन विधिपूर्वक सजवलेला घट मांडून त्यावर श्रीफल ठेवले जाते. घटा भोवती पिकांचे प्रतीक म्हणुन विविध प्रकारची धान्ये पेरली जातात. नऊ दिवस रोज फुलांची एक माळ पूजेच्या घटावर चढवली जाते. दहाव्या दिवशी घटाचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी हे विसर्जन नवव्या दिवशी रात्रौ बारा वाजेनंतर केले जाते. देवी आदिजननी कोमलहृदयी असुन रज तम सत्व हे तिन्ही गुण तिच्या एका रुपात एकवटले आहेत. ह्याची एक पौराणिक कथा आहे. पुर्वी मधु-कैटभ आणि कुंभ निकुंभ ह्या दैत्यानी अत्याचार आणि अनाचार माजविला होता.

आदिशक्तिने त्यांच्या बरोबर घनघोर युद्ध करून त्यांचा पराभव केला. त्या वेळी देवी थकली असल्याने ति घोर निद्रेत विश्रांति घेत होती. ही संधी साधुन महिषासुर नामक दैत्याने धुमाकुळ घातला (त्याचा पराभव आदिशक्ति कडुन होणार होता). तिन्ही लोक त्रस्त झाले होते. देवलोकात भीतीचे वातावरण होते. म्हणुन सर्व देव ब्रम्हा विष्णु महेश या त्रिदेवाना शरण गेले. त्यांची व्यथा समजल्यावर त्रिदेव विश्रांति घेत असलेल्या आदिशक्तिला आवाहन करून जागे केले.त्रिदेवांनी देवीला महिषासुराचे पारिपत्य करण्याची केलेली विनंती मान्यकरून देविने विराट रूप घेतले.

अठरा हातात वेगवेगळी शस्रे घेवुन महिषासुरा सोबत युद्ध सुरु केले. तो दिवस आश्विन शुद्ध प्रतिपदेचा होता.सतत नऊ दिवस युद्ध केल्यानंतर दैत्य देवीला शरण आला. आणि तिन्ही लोक निर्भय झाले. तेव्हापासुन देवीला महिषासुर मर्दिनी असे नाव पडले. मुळ बंगाली लोकांचा असलेला दुर्गापूजेचा हा सण लोकांनी नवरात्रौत्सव म्हणुन प्रचलित केला. मात्र आज मुंबईत सर्वाधिक मोठ्या प्रमाणात हा इवेंट म्हणुन साजरा होतो, यामागे अर्थकारण जास्त आणि समाजकारण मात्र कमी असते. तरीही दांडीया आणि रासगरबा ह्या मुळे रसिकजन ह्या उत्सवाकड़े मोठ्या प्रमाणात ओढला जातो.